Pune Rain Update: पावसामुळे पुण्यात वाहतूक कोंडी; ‘या’ वेळेत अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन
Pune Rain Update: नागरिकांनी शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक किंवा कारपूलचा वापर करावा

Pune Rain Update: शहरात सुरू असलेल्या पावसामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढल्याने पुणे शहर वाहतूक पोलिसांनी नागरिकांसाठी सार्वजनिक सूचना जारी केली आहे.
एटीएमएस आणि ट्रॅफीक्युअर प्रणालीच्या माहितीनुसार, गुरुवारी (२ जुलै) शहरातील वाहनांचा सरासरी वेग २१.४ किमी प्रतितास इतका नोंदविण्यात आला असून, सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत तो १७ किमी प्रतितासपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत शक्यतो अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
वाहतूक कोंडीची शक्यता असलेले मार्ग कोणते? (Pune Rain Update)
वाहतूक कोंडीची शक्यता असलेल्या प्रमुख मार्गांमध्ये टिळक रस्ता (अलका चौक-स्वारगेट), शास्त्री रस्ता (अलका चौक-दांडेकर पूल), शिवाजी रस्ता (स्वारगेट), जे. एम. रोड (मॉडर्न कॉलेज-खंडोजी बाबा चौक), एफ. सी. रोड (गुडलक चौक-ज्ञानेश्वर पादुका चौक), कर्वे रस्ता-पौड रस्ता परिसर, एस. बी. रोड, सोलापूर रस्ता तसेच सातारा रस्ता (मार्केट यार्ड-कात्रज नाका) यांचा समावेश आहे.
याशिवाय पुणे रेल्वे स्थानक परिसर, अलंकार चौक, कौन्सिल हॉल चौक, वाडिया कॉलेज चौक आणि बंड गार्डन परिसरातही वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Pune Rain Update)
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना चौक, बसथांबे, उड्डाणपूल, पादचारी मार्ग किंवा पाणी साचलेल्या ठिकाणी वाहने उभी न करण्याचे आवाहन केले आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, लेन कटिंग आणि अचानक ब्रेक लावणे टाळावे, तसेच दुचाकीस्वारांनी उड्डाणपुलाखाली किंवा मुख्य रस्त्यावर आश्रय घेऊ नये, असेही सूचित करण्यात आले आहे.
व्यावसायिक व मालवाहतूक वाहनांनी गर्दीच्या वेळेत मुख्य मार्गांवर थांबणे टाळावे. नागरिकांनी शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक किंवा कारपूलचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा:






