Devdutt Nage : डेव्हिड वॉर्नरच्या तोंडी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’; देवदत्त नागेंनी सांगितला मेलबर्नमधला खास किस्सा
Devdutt Nage : नुकत्याच एका मुलाखतीत देवदत्तने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याच्यासोबत घडलेला एक खास किस्सा सांगितला.

Devdutt Nage : ‘जय मल्हार’ या लोकप्रिय मालिकेत मार्तंड मल्हाराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे आजही श्री खंडेरायावरील आपली श्रद्धा जपताना दिसतो. मालिकेमुळे मिळालेल्या यशाचं श्रेय तो नेहमी खंडेरायाला देतो. त्यामुळे कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी कपाळी भंडारा लावण्याचा त्याचा नियम आजही कायम आहे. (Devdutt Nage)
नुकत्याच एका मुलाखतीत देवदत्तने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याच्यासोबत घडलेला एक खास किस्सा सांगितला. हा अनुभव ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. (Devdutt Nage)
देवदत्त म्हणाला, “मी मेलबर्नमध्ये शूटिंग करत होतो. रोजच्या सवयीप्रमाणे आंघोळ करून कपाळी भंडारा लावून सेटवर गेलो. मेकअपसाठी बसलो असताना डेव्हिड वॉर्नरने माझ्या कपाळाकडे पाहत विचारलं, ‘This is Turmeric?’ म्हणजे ‘ही हळद आहे का?'” (Devdutt Nage)
Instagram पर यह पोस्ट देखें
यावर देवदत्तने त्याला सांगितलं की, “ही हळद नसून श्री खंडेरायाचा भंडारा आहे.” हे ऐकल्यानंतर वॉर्नरनेही उत्सुकता दाखवत स्वतःच्या कपाळी भंडारा लावण्याची इच्छा व्यक्त केली. एवढंच नाही, तर देवदत्तने त्याला “येळकोट येळकोट जय मल्हार” म्हणायला सांगितलं. वॉर्नरने तोडक्या-मोडक्या शब्दांत का होईना, पण हा जयघोष केला आणि कपाळी भंडारा लावला. (Devdutt Nage)
हेही वाचा : Pune News : पुणेकरांसाठी आनंददायी बातमी! धरणांच्या पाणीसाठयात वाढ सुरू
या आठवणीबद्दल बोलताना देवदत्त म्हणाला, “श्री खंडेरायांची कृपा अशी आहे की मेलबर्नमध्येही एका परदेशी व्यक्तीच्या तोंडून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ ऐकायला मिळालं.”
देवदत्तच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, ‘देवयानी’ मालिकेतून त्याने अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्याला खरी ओळख ‘जय मल्हार’ या मालिकेने मिळवून दिली. त्यानंतर त्याने ‘डॉक्टर डॉन’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. तसेच ‘आदिपुरुष’मध्ये हनुमानाची भूमिका, ‘तानाजी’, ‘सत्यमेव जयते’, ‘मिस्टर मजनू’, ‘वीर शिवाजी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी दमदार अभिनय केला. सध्या तो दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडत आहेत. (Devdutt Nage)
हेही वाचा : Bachchu Kadu : “ठाकरे गटावर ही परिस्थिती…”; बच्चू कडूंनी थेट नाव घेत साधला निशाणा





