पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी; फोन करणारा ताब्यात
Updated On:

Pune News | पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला होता. पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात अज्ञात व्यक्तीकडून सकाळी 9 वाजता हा फोन आल्याची माहिती आली आहे. त्यानंतर पोलिसांची यंत्रणा तात्काळ कामाला लागली.
दरम्यान, फोन करणाऱ्या व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे वय 40 असून तो पिंपरी – चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे.
सदरील व्यक्तीने दारूच्या नशेत खोडसाळपणे फोन केल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी आता पिंपरी – चिंचवड पोलिसांकडून सदरील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.





