pune : ४० मंडळांना ‘जीपीएस’ यंत्रणा
pune :

शहरातील वाहतूक बदलाची माहिती एका ‘क्लिक’वर
pune : विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या ४० मंडळांसाठी ‘जीपीएस’ यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून मार्गस्थ झालेले मंडळ कोणत्या चौकात आहे, याबाबतची माहिती पोलिसांना उपलब्ध होणार आहे.
विसर्जन मिरवणुकीचा वेग वाढविण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. याबराेबरच विसर्जन सोहळ्याच्या दिवशी शहरातील वाहतूक बदलाची माहिती पोलिसांकडून नागरिकांना देण्यासाठी संकेतस्थळही (diversion.punepolice.gov.in) सुरू करण्यात आले आहे.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून विसर्जन सोहळ्याचे मार्ग, वाहतूक बदल, पर्यायी मार्ग, वाहने लावण्याची व्यवस्था, तसेच प्रमुख मंडळांची माहिती नागरिकांना मिळणार आहे.
विसर्जन सोहळ्यासाठी करण्यात आलेले वाहतूक बदल नागरिकांना समजणार आहेत. पुणे पोलिसांनी याबाबत गुगल मॅपशी समन्वय साधला आहे. बंद आणि खुले रस्ते या माध्यमातून समजणार आहे.
शहरातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी या संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.
पालखी सोहळ्यात पोलिसांनी वाहतूक बदलांची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून दिली होती. नागरिकांनी या संकेतस्थळावरील माहितीस प्रतिसाद दिला होता. पुणे शहरात चार हजार १७० सार्वजनिक मंडळे आहेत. त्यापैकी दोन हजार ३७८ मंडळे ही नोंदणीकृत आहेत.





