Pune : भाजपकडून शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील निवडी जाहीर

वाघोली(प्रतिनिधी):-शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील अनेक दिग्गजांचा पक्ष संघटनेत समावेश करून भाजपने विधानसभा मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली असल्याचे चित्र दिसून आले आहे.पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्हा उत्तर विभागाचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र मान्यवरांना देण्यात आल्याची माहिती शिरूर हवेली विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख प्रदीप दादा कंद यांनी दिली.
भगवान शेळके यांची पुणे जिल्हा भाजपच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात करण्यात आली आहे.पंचायत समिती हवेली चे माजी सदस्य श्याम गावडे यांची हवेली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तर शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
वाघोली तालुका हवेली येथील माजी उपसरपंच संदीप सातव यांची पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.सोरतापवाडी येथील पुनम चौधरी यांची महिला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर यांची देखील जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वाघोली चे प्रदीप सातव यांची पुणे जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपने तरुणाईला संधी दिल्याने आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर या संघटनात्मक जबाबदाऱ्यांचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लवकरच दोन्ही तालुक्यातील इतर नियुक्ती केली जाणार असल्याचे प्रदीप कंद यांनी सांगितले.
भाजपच्या दिग्गज नेत्यांचे विशेष लक्ष…
माजी मंत्री संजय भेगडे, आमदार राहुल कुल,आमदार महेश लांडगे,माधुरी मिसाळ, प्रदीप कंद,माजी महापौर मुरलीधर मोहोळ,योगेश टिळेकर, विक्रांत पाटील,राजेश पांडे, जगदीश मुळीक, राहुल लोणीकर, संदीप भोंडवे, धीरज घाटे, बापूसाहेब पठारे, अनुप मोरे, बाबाराजे जाधवराव, गणेश भेगडे, विजय हरगुडे, किरण दगडे आदी नेत्यांचे विशेष लक्ष पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी असून पुढील काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.





