Modi Government : उद्योगपतींकडेच नोकऱ्यांसाठी याचना ही सरकारच्या अपयशाची कबुली; गोपाळ तिवारी यांची टीका
रोजगार निर्मिती व कामगार पोषक धोरणे राबवण्यापेक्षाही भांडवलशाहिस अनुकूल उद्योगपती धार्जिण धोरणे राबवण्यास मोदी सरकार (Modi Government) हतबल असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

Modi Government : भारतात, सांविधानिक लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेत उद्योग व रोजगार विषयक धोरणे राबावणाऱ्या केंद्र सरकारने उद्योगपतींकडे (Modi Government) नोकऱ्यांची विचारणा वा याचना करणे ही शोकांतिका असून, ही सरकारच्या अपयशाची कबुली असल्याची प्रखर टीका पंतप्रधानांच्या फीक्कीमधील भाषणावर काँग्रेसने केली.
रोजगार निर्मिती व कामगार पोषक धोरणे राबवण्यापेक्षाही भांडवलशाहिस अनुकूल उद्योगपती धार्जिण धोरणे राबवण्यास मोदी सरकार (Modi Government) हतबल असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
तिवारी म्हणाले, २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ४४ पैकी २९ कामगार हिताचे कायदे रद्द केले. त्यामुळेच अर्थिक नफा केंद्रस्थानी ठेऊन उद्योजकांनी कामगार खर्च कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली व सरकार बघ्याची भूमिका घेत बसले.
मात्र, देशांतर्गत युवा शक्ती जागरूक होत असल्याचा प्रत्यय १२ वर्षे निद्रीस्त सरकारला नुकताच येत असल्याने व प्रतिवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याच्या घोषणेचे उशीरा स्मरण झाल्याने प्रधानमंत्री मोदी यांनी उद्योगपतींनाच नोकऱ्या व कामगारांची पगारवाढविषयी विचारणे केली हा लोकशाही व्यवस्थेतील मोठा विनोद असुन मोदी सरकारने रोजगार, नोकऱ्या विषयी सरकारच्या अपयशाची कबुलीच दिली असल्याची टीका गोपाळ तिवारी यांनी केली.
भाजप नेतृत्वाने इलेक्टोरल बॅांड स्वरुपात देणग्या व पक्षनिधी घेऊन उद्योगपतींना टॅक्स सवलती, कर्जमाफी देऊन त्यांना हवे तसे, मात्र कामगार हिताचे कायदे रद्द करून उद्योगपती मित्रांवर खैरात केल्याची प्रखर टिका ही त्यांनी (Modi Government) केली.






