India -Nepal : नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी 24,000 कोटींची मदत; भारताकडून विशेष पॅकेजची घोषणा
नेपाळमध्ये ऑगस्ट महिन्यात भीषण पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती. आता नेपाळच्या (India -Nepal) पुनर्बांधणी आणि दीर्घकालीन विकासासाठी 24,000 कोटी नेपाळी रुपयांचे विकास सहकार्य पॅकेज भारताकडून जाहीर करण्यात आले आहे.

India -Nepal : नेपाळमध्ये ऑगस्ट महिन्यात भीषण पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती. आता नेपाळच्या (India -Nepal) पुनर्बांधणी आणि दीर्घकालीन विकासासाठी 24,000 कोटी नेपाळी रुपयांचे विकास सहकार्य पॅकेज भारताकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच भारत आणि नेपाळमध्ये सोमवारी ८ महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी करण्यात असून ६ प्रकल्पांचे लोकार्पणही करण्यात आले.
नेपाळचे (India -Nepal) पंतप्रधान बालेंद्र शाह दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बालेंद्र शाह यांनी आज सरयू-कमला एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे भारतातील अयोध्या ते नेपाळमधील जनकपूर दरम्यान धावणार आहे. तत्पूर्वी, राष्ट्रपती भवनात बालेंद्र शाह यांचे रेड कार्पेट अंथरून आणि गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत करण्यात आले.
नरेंद्र मोदी म्हणाले, नेपाळच्या पुनर्बांधणी आणि दीर्घकालीन विकासासाठी आम्ही 24,000 कोटी नेपाळी रुपयांचे विकास सहकार्य पॅकेज जाहीर करत आहोत. याचे कारण असे की, भारत आणि नेपाळ केवळ शेजारी देश नाहीत, तर त्यांचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा एकमेकांत खोलवर गुंफलेल्या आहेत. आमचे हे संबंध शतकानुशतके जुने आहेत.
2018 मधील आपल्या जनकपूर भेटीची आठवण करून देताना मोदींनी नमूद केले की, भारत आणि नेपाळमधील संबंध थेट प्रभू राम आणि माता सीतेशी जोडलेले आहेत. अयोध्या हे प्रभू रामांचे नगर आहे, तर नेपाळमधील जनकपूर हे माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते. या दोन्ही ठिकाणांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे, जे आपल्या परस्पर संबंधांचा पाया आहे. नेपाळशिवाय आपली पवित्र तीर्थस्थळे आणि प्रभू रामही अपूर्ण आहेत. आपल्या संबंधांचे हे एक वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप आहे, जे आपल्याला एकमेकांच्या अधिक जवळ आणते.
दोन्ही देशांमध्ये ८ करार
या दौऱ्याच्या (India -Nepal) निमित्ताने भारत आणि नेपाळमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत एकत्र काम करण्यासाठी एकूण आठ महत्त्वाचे करार करण्यात आले. या करारांमध्ये अंतराळ विज्ञान, पोलीस व सुरक्षा प्रशिक्षण, सरकारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, आरोग्य सेवा, आयुर्वेद, पर्यावरणपूरक शहरी विकास आणि शेती-पशुपालन या विषयांचा समावेश आहे. अंतराळ आणि दळणवळण क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारताची अंतराळ संस्था इस्रो आणि नेपाळचे माहिती व दळणवळण मंत्रालय यांच्यात करार झाला आहे. या कराराद्वारे दक्षिण आशिया उपग्रहाचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी सॅटेलाईट कम्युनिकेशन नेटवर्क उभारले जाणार आहे.






