Pune : लवकरच ससून सर्वोपचार रुग्णालयातील पदे भरली जाणार; पुण्यात कॅन्सर हॅास्पिटल उभारणार: वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

पुणेः शहरातील ससून सर्वोपचार हे शासकीय रुग्णालय असून येथे उपचार घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असतात. मात्र, या रुग्णालयातील अनेक पदे भरलेली नाहीत. यामुळे रुग्णालय प्रशासनावर मोठा ताण येतो. ३ मार्चपासून विधानसेभच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून, काल ६ मार्च रोजी पुण्यातील आमदारांनी ससून रुग्णालयाच्या असुविधांचा पाढचा वाचला. तसेच रुग्णालयातील रिक्त पदे आदी गोष्टींवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नावर उतर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ससून रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरली जातील, असे आश्वासन दिले.
ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयात 2350 एकूण पदे मंजूर आहेत. त्यातील 769 पदे ही रिक्त आहेत. तसेच 156 नर्सिंगची पदे रिक्त आहेत. ही पदभरती प्रक्रिया लवकरच होणार असल्याची माहिती मिसाळ यांनी दिली. ही पदभरती टीसीएसद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकवेळा यापूर्वी देखील यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात यासाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी हलचाली केल्या जातील. तसेच वर्ग एक ची 44 आणि वर्ग दोन ची 110 रिक्त पदे तात्काळ भरली जातील, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिले.
पुणे : ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयात 2350 पदे मंजूर आहेत. पण त्यातील 769 पदे ही रिक्त आहेत. तसेच 156 नसिंगची पद रिक्त आहेत. म्हणजे वर्ग चारची 50 टक्के पद रिक्त आहेत. ही पदभरती टीसीएस द्वारा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते. अनेकवेळा यापूर्वी देखील यासाठी पाठपुरावा… pic.twitter.com/A8gQorpCkd
— Madhuri Misal (@madhurimisal) March 7, 2025
विधानसभेत आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, आमदार शरद सोनवणे, आमदार भीमराव तापाकिर आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालया संबंधीत लक्षवेधी प्रश्न मांडला होता. या प्रश्नांना उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे जेथे पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येत असतात. वर्षाला साडे पाच लाख बाह्यरुग्ण येथे येतात. तर पुणे शहरातील जवळपास साठ हजार रुग्ण येथे अॅडमिट असतात. येथे 155 खाटांचा आयसीयु आहे. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयांवर अधिकचा भार पडत आहे.
लवकरच पुण्यात कॅन्सर रुग्णालय
कॅनरचे वाढते रुग्ण पाहता पुण्यात कॅन्सर रुग्णायल करण्यासाठी राज्य शासन विचाराधीन आहे. त्यासाठी एमएसआरडीसीकडे जागेची मागणीदेखील करण्यात आली आहे. ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.





