पुणे: जागतिक कीर्तीचे गायक हिम्मतकुमार पंड्या यांचे टपाल तिकीट प्रसिद्ध

पुणे: जागतिक कीर्तीचे पुण्यातील प्रसिद्ध गायक हिम्मतकुमार पंड्या यांचे टपाल तिकीट पुणे सिटी पोस्ट कार्यालयाच्या शताब्दीवर्षपूर्ती निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आले. भारत सरकारच्या महान व्यक्ती, महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचे फोटो टपाल तिकीटावर छापण्याच्या योजनेअंतर्गत हे तिकीट “माय स्टॅम्प” उपक्रमातून तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, इतर तिकीटाप्रमाणे हे तिकीट देशभरात पत्र पाठवण्यासाठी टपाल तिकीट म्हणून वापरता येईल.
यावेळी चित्रकार समीर धर्माधिकारी, पुणे सिटी पोस्ट कार्यालयाचे वरिष्ठ पोस्टमास्तर विजय घुले आणि उप-पोस्टमास्तर संदीप ढवळे उपस्थित होते. या तिकिटाच्या प्रकाशनाने पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला मानवंदना देण्यात आली असून, हिम्मतकुमार पंड्या यांच्या संगीतमय योगदानाचा गौरव झाला आहे. पुणे सिटी पोस्ट कार्यालयाच्या शताब्दीवर्षानिमित्त हा उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरला आहे.





