Rambhau Moze : दुःखद बातमी..! काँग्रेसचे माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन; शरद पवारांचे खंदे समर्थक काळाच्या पडद्याआड
Rambhau Moze : Rambhau Moze : पुण्यातील ज्येष्ठ राजकारणी, काँग्रेसचे माजी आमदार आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

Rambhau Moze : पुण्यातील ज्येष्ठ राजकारणी, काँग्रेसचे माजी आमदार आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. (Rambhau Moze)
रामभाऊ मोझे यांनी जुन्या बोपोडी विधानसभा मतदारसंघातून १९८०, १९८५ आणि १९९० अशा सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवत आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. त्या काळात ते काँग्रेस (सोशलिस्ट) पक्षाकडून निवडून आले होते. पुढे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०१२ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये पुनरागमन केले. (Rambhau Moze)
राजकारणाबरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांनी गेनबा सोपानराव मोझे ट्रस्टची स्थापना करून पुण्यात शाळा, अभियांत्रिकी, फार्मसी आणि इतर व्यावसायिक शिक्षण संस्थांची उभारणी केली. येरवडा, बालेवाडी, वाघोलीसह विविध भागांत या संस्था कार्यरत आहेत. (Rambhau Moze)
पुण्यातील येरवडा, संगमवाडी आणि बालेवाडी परिसरातील विकासकामे तसेच शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे रामभाऊ मोझे यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या पश्चात राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील समृद्ध वारसा कायम राहणार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. (Rambhau Moze)
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
पुण्यनगरीचे ज्येष्ठ नेते, बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ गेनबा मोझे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने पुणे शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे, नागरिकांच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक आपण… pic.twitter.com/CEnXLKXMq5
— Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) July 13, 2026
त्यांच्या पार्थिवावर आज (१३ जुलै) सायंकाळी ५ वाजता पुण्यातील संगमवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. (Rambhau Moze)





