Pune: येरवडा परिसरात पोलिसांचे रूट मार्च

येरवडा – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील भागामध्ये संचलन करण्यात आले. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी तसेच कुठेही अनुचित प्रकार घडू नये.यासाठी
यासाठी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमधील दाट लोकवस्तीतील लक्ष्मी नगर चौकी मधील भगवा झेंडा चौक, राज चौक, चित्रा चौक, भगतसिंग चौक अशा संवेदनशील भागातून तसेच जेल रोड चौकी हद्दीमधील नागपूर चाळ, स्वराज्य मित्र मंडळ, लुंबिनी गार्डन या भागामधून रूट मार्च करण्यात आला.
या रुट मार्चमध्ये परिमंडळ- ४चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, येरवडा पोलीस स्टेशनचे रविंद्र शेळके,बीएसएफ 30 बटालियनचे डेप्युटी कमांडंट मनोज कुमार, असिस्टंट कमांडंट नीरज पांडे, इन्स्पेक्टर अमन कुमार, 2 अधिकारी व 50 कर्मचारी तसेच परिमंडळ ४ची आरसीपी मोबाइल यावरील 1 अधिकारी व 8 अंमलदार व येरवडा पोलीस स्टेशन कडील 2 अधिकारी व 15 अंमलदार असे सहभागी होते.





