PUNE: पीएमपीएमएल कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

पुणे : पीएमपीएमएल कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी वारंवार बैठक घेऊनही पीएमपी प्रशासनाकडून या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जात नाही. यामुळे कामगारांच्या प्रलंबित मागण्यांठी येत्या मंगळवारी (दि. १५) रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांंनी दिला आहे. याबाबतचे पत्र भानगिरे यांनी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांना दिले आहे.
याबाबत माहिती देताना शहराध्यक्ष भानगिरे म्हणाले की, कामगारांंच्या मागणीसाठी संचालकांच्या दालनात ११ डिसेंबर रोजी बैठक झाली होती. या बैठकीत काही मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी महिनभारानंतरही त्याची पूर्तात झालेली नाही. तसेच या बैठकीत झालेल्या चर्चेचा वृतांत दिशाभूल करणारा आहे. ही प्रशासनाची कृती शासकीय नियमास अनुसरून नसल्याने हे आंदोलन केले जाणार असून आंदोलनामुळे शहराची औद्योगिक शांतता भंग पावल्यास तसेच काही नुकसान झाल्यास अध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक जबाबदार राहतील, असा इशाराही शहराध्यच भानगिरे यांनी दिला आहे.





