PUNE: २२ वर्षे विना अपघात चालविली पीएमपी; उत्कृष्ट सेवा बजाविणार्या चालकांचा सत्कार

पुणे – शहरातील अपूरे रस्ते आणि खासगी वाहनांच्या गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावर पीएमपीचे दिवसाला पाच ते दहा लहान मोठे अपघात होतात. अशा स्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेचे जबाबदारी घेत तब्बल २२ वर्षे एकदाही अपघात न केलेले पीएमपीचे चालक अरूण कुचेकर यांच्यासह पीएमपी वेगवेगळ्या डेपोतील १५ चालकांचा विशेष सत्कार पीएमपीएमएलच्या वतीने करण्यात आला.
रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने पीएमपीकडून चालक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या, निमित्ताने १५ चालकांचा विशेष सत्कार पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते करण्यात आला. पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यावेळी उपस्थित होते. पीएमपीच्या सेवेत चालकांची जबाबदारी महत्त्वाची असून त्यांच्या प्रयत्नामुळे पीएमपी अपघात मुक्तीच्या दिशेने जाऊ शकते. त्यासाठी इतर चालकांनी या अपघात न केलेल्या चालकांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन डाॅ. कोलते यांनी यावेळी इतर चालकांना केले.
पीएमपीच्या प्रत्येक बस डेपोतील विना अपघात सेवा देणाऱ्र्या १५ चालकांचा गौरव, कंशात डेपोचे नावत्यामध्ये विनायक भाऊसाहेब दराडे (स्वारगेट), कैलास दादाभाऊ आदक (कोथरूड), जयराम सोपान गायकवाड (नरवीर तानाजी वाडी), जयप्रकाश कोंडुजी ढोरे (कात्रज), विठ्ठल पांडुरंग राऊत (अप्पर), नितीन मोहन चव्हाण (हडपसर), फुलचंद महादेव सानप (शेवाळेवाडी), अविनाश नरेश धनगर (निगडी), अरूण नारायण कुचेकर (स्वारगेट), सुनील बाळू जाधव (भोसरी), दत्तात्रय महारूद्र कचरे (पिंपरी), हनुमंत नारायण चौधरी (भेकराईनगर), संतोष दत्तात्रय पोळ (बाणेर), संभाजी नंदकिशोर कांगणे (पुणे स्टेशन), शंकर भिमराव कोळेकर (वाघोली), नवनाथ श्रीकांत माने (बालेवाडी)
२२ वर्षे विना अपघात सेवा
पीएमपीच्या स्वारगेट डेपोतील चालक अरूण कुचेकर यांनी गेली २२ वर्षे चालक म्हणून विना अपघात सेवा बजाविली आहे. असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (ए.एस.आर.टी.यु.) या संस्थेने मागील वर्षी दिल्ली येथे बोलावून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. तसेच पीएमपीकडूनही चालकांना प्रशिक्षण देताना कुचेकर मार्गदर्शन करत असून त्यांच्या या सेवेचा चालकांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे चित्र आहे.





