Pune | आजपासून आठ दिवस प्लॅटफॉर्म तिकीट बंद
Updated On:

पुणे – महापरिनिर्वान दिनामुळे पुढील काही दिवस रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ शकते. त्यामुळे मध्य रेल्वेने महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट येत्या दि. २ ते ९ डिसेंबर दरम्यान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.
मध्य रेल्वेने दिवाळीत काही दिवस महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट बंद केले होते. त्याचा गर्दी नियंत्रणासाठी फायदा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मध्य रेल्वेने आता महापरिनिर्वान दिनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी या कालावधीत सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवासाठी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.





