Pune Peoples Bank : पुणे पीपल्स बँकेला मानाचे पाच पुरस्कार
Pune Peoples Bank : नागरी सह. बँक्स असोसिएशनच्या कार्यक्रमात बँकेचा सन्मान

Pune Peoples Bank : नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र), अॅक्मे इन्फोमीडिया आणि नाफकब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 3 री राष्ट्रीय नागरी सहकारी बँकिंग शिखर परिषद पुण्यात पार पडली. या प्रतिष्ठित सोहळ्यात पुणे पीपल्स को-ऑप. बँकेचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात बँकेस बेस्ट मल्टी स्टेट अर्बन को-ऑप. बँक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार बँकेचे वतीने अध्यक्ष श्रीधर गायकवाड, बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, बँकेचे संचालक विश्वनाथ जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) श्री संजय भोंडवे, यांनी स्विकारले.
बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड यांना बेस्ट चेअरपर्सन ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आले.
जोखीम व अनुपालन व्यवस्थापनातील प्रभावी अंमलबजावणीबद्दल मोहन थोरात यांना बेस्ट रिस्क अँड कॉम्प्लायन्स इम्प्लिमेंटेशन पुरस्कार मिळाला. तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बँकेचे आयटी प्रमुख कैलास पवार यांना बेस्ट सीआयएसओ ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच निधी व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल बँकेचे ट्रेझरी हेड घनश्याम सानस यांना बेस्ट ट्रेझरी मॅनेजमेंट इम्प्लिमेंटेशन पुरस्काराने गौरविण्यात आले.
आर्थिक वर्ष 2025-26 अखेर बँकेने एकूण व्यवसायाचा रु. 3,063 कोटीचा टप्पा पार केला असुन यामध्ये ठेवी रु. 1,841 कोटी तर कर्जे रु. 1,222 कोटी यांचा समावेश आहे. बँकेचे निव्वळ एनपीए प्रमाण 0%, सीडी रेशो 66.41% इतका आहे.
बँकेने शेड्युल दर्जा प्राप्त होण्याचे निकष पूर्ण केले असल्याने त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी आर्थिक वर्षात बँक 3 नवीन शाखा सुरू करण्याच्या तयारीत असून, राज्याबाहेरही शाखा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.





