Pune Peoples Bank: बँकेचे मूल्यांकन करताना ते केवळ आकडेवारीत करणे योग्य नाही. सहकारात बँकेचे मूल्यांकन हे सामाजिक कामात देखील करायला हवे, सुरुवातीला पुणे पीपल्स बँकेची ओळख ही रिक्षावाल्यांची बँक अशी होती. आजही बँकेच्या विविध कार्यातून सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट होत आहे, असे मत राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे यांनी व्यक्त केले. पुणे पीपल्स को-ऑप बँक लि., पुणे अमृतमहोत्सवी वर्षात (75) पदार्पण करीत असून त्यानिमित्ताने अमृतमहोत्सवानिमित्त बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.पराग काळकर. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक संजय कुमार, ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे, सहकारी संस्था पुणेचे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांसह बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड, उपाध्यक्ष बिपीनकुमार शहा, व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष अॅड.सुभाष मोहिते, संचालक सीए जनार्दन रणदिवे, बबनराव भेगडे, सुभाष नडे, डॉ. रमेश सोनवणे, सुभाष गांधी, मिलिंद वाणी, वैशाली छाजेड, निशा करपे, संजीव असवले, डॉ.विश्वनाथ जाधव, स्वीकृत तज्ञ संचालिका श्वेता ढमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोंडवे, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य सीए अजिंक्य रणदिवे, कौस्तुभ भेगडे, उदय जग्ताप, राजेंद्र गांगर्डे, अरुण डहाके आदी उपस्थित होते. मनोरुग्ण महिलांसाठी कार्य करणा-या माऊली सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगरचे संस्थापक डॉ.राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांना पुणे पीपल्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुपये 1 लाख 1 हजाराचा धनादेश, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष अॅड.सुभाष मोहिते म्हणाले, लवकरच बँकेला डायरेक्ट मेंबरशीप व शेडयुल्ड दर्जा मिळविण्यात आम्ही यशस्वी होऊ.