पुणे पीपल्स बँकेचा वर्धापनदिन समारंभ उत्साहात संपन्न

पुणे – पुणे शहरातील समाज धुरंधरीनी 1952 साली वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर स्थापन केलेल्या पुणे पीपल्स को-ऑप बँक लि., पुणे या मल्टीस्टेट को-ऑप बँकेचा 73 वा वर्धापनदिन समारंभ बुधवार दि 1 फेब्रुवारी रोजी बँकेचे सभासद, ग्राहक, हितचिंतक, संचालक मंडळ सदस्य व सेवकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या निमित्ताने बँकेने ग्राहक मेळावा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते.
बँकेने एकूण व्यवसायाचा 2,582 कोटीचा टप्पा पार केला आहे. यामध्ये ठेवी रु. 1,598 कोटी, कर्जे रु.984 कोटींचा समावेश आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे यांनी दिली.राज्यातील इतर जिल्हयात शाखा विस्तार करणे, इंटरनेट बैंकिंग सुरु करणे, शेडयुल्ड बँकेचा दर्जा प्राप्त करणे आदी उद्दिष्टे असल्याचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅड सुभाष मोहिते यांनी नमूद केले. बँकेच्या संचालिका निशा करपे व तज्ञ संचालिका श्वेता ढमाळ यांनी सांगितले की, या निमित्ताने महिलांची 200 आर. डी. (रिकरींग डिपॉझिट) खाती उघडण्यात आली.
आ. हेमंत रासने, पुणे ग्रामीणचे जिल्हा उप निबंधक प्रकाश जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, निवृत्त न्यायाधीश एस पी कुलकर्णी, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलिप मुरकेटे, शिवक्रांती पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव शिंदे, सेवानिवृत्त ऑडीटर रमेश वाणी, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काकडे, नितीन कोतवाल, किशोर ढमाळ, अनिल सोंडकर, बँकेचेउपाध्यक्ष डॉ. रमेश सोनवणे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) संजय भोंडवे उपस्थित होते.




