Pune Peoples Bank: पुणे पीपल्स बँकेच्या व्यवसायात वाढ; बँकेला रिझर्व्ह बँकेकडून डायरेक्ट मेंबरशिप प्राप्त
Pune Peoples Bank: बँकेच्या ठेवी 1,841 कोटीपर्यंत पोहोचल्या असून कर्जवाटप 1,222 कोटीवर गेले आहे.

Pune Peoples Bank: पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. ने आर्थिक वर्ष 2025-26 अखेरीस एकूण व्यवसाय 3,063 कोटीबा टप्पा पार करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण व्यवसायात 357 कोटींची वाढ झाली आहे.
बँकेच्या ठेवी 1,841 कोटीपर्यंत पोहोचल्या असून कर्जवाटप 1,222 कोटीवर गेले आहे. सध्या बँकेचा सीडी रेशो 66.41% इतका समाधानकारक आहे. बँकेचा प्रति कर्मचारी व्यवसाय 13.50 कोटी इतका असून, कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ दर्शवितो विशेष म्हणजे, बँकेने मागील अनेक वर्षे 0% नेट एनपीए राखला असून ही बँकेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
अमृत महोत्सवी वर्ष (75 वे वर्ष) साजरे करत असताना बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँकेकडून डायरेक्ट मेंबरशिप प्राप्त झाली आहे. त्यामुळे बँकेच्या डिजिटल पेमेंट, क्लिअरिंग व सेटलमेंट प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहेत. बैंकने शेड्युल दर्जा प्राप्त होण्याचे निकष पूर्ण केले असल्याने त्यासाठी बैंक प्रयत्न करत आहे.
हेही वाचा – श्री तिरूपती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद मुंदडा यांची निवड
आगामी आर्थिक वर्षात बैंक 3 नवीन शाखा सुरू करण्याच्या तयारीत असून, राज्याबाहेरही शाखा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत बँकेच्या सेवा पोहोचविण्याचा बँकेचा मानस आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड यांनी दिली.
ग्राहकांचा वाढता विश्वास, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, पारदर्शक व्यवहार आणि समर्पित सेवा या बँकेच्या यशामागील प्रमुख घटक आहेत. अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने बँक विविध उपक्रम राबविणार असून, त्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे.
भविष्यातही ग्राहकाभिमुख सेवा देत प्रगतीची ही घोडदौड कायम ठेवण्याचा बँकेचा निर्धार आहे. तसेच बँकेची आर्थिक परिस्थिती छोट्या बँका विलीनीकरण करून घेण्यासाठी सक्षम असल्याने त्यासाठी बँक प्रयत्न करत आहे. असे बँकेचे व्यस्थापकीय समितीचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी सांगितले.





