Pune: अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ महर्षीनगर परिसरात पदयात्रा

बिबवेवाडी – महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक प्रभाग २८ महर्षीनगर आणि ३४ हिंगणे खुर्द- सिंहगड रोड याठिकाणी पदयात्रा झाली.
महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिला, युवक, अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. महर्षिनगर, मीनाताई ठाकरे (औद्योगिक वसाहत), इंदिरानगर गुलटेकडी, मुकुंदनगर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ भागात नागरिकांचा पाठिंबा विजय निश्चित करणारा ठरणार आहे.
गरज नसताना स्थानिक नागरिकाचा विरोध असतानाही डीपी आराखड्यात नदीवरील नियोजित पूलाचीआखणी करण्यात आली. त्यामुळे पू. ल. देशपांडे उद्यान नवशा मारुती मंदिरामागे स्थानिक राहिवासी यांना कायमस्वरूपी त्रास असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. मतदारसंघातील नागरी प्रश्न सोडविण्यात लोकप्रतिनिधी अपयशी झाल्या असून ही निष्क्रियता आपल्या सर्वांना संपवायची आहे.
पुणे मनपा स्थायी समिती पदी अध्यक्ष म्हणून काम पाहताना पुणे शहरात अनेक लोक उपयोगी प्रकल्प मार्गी लावत स्मार्ट आणि सुंदर पुणे घडविले आहे. आता पर्वतीकरांची लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहे. आपल्या सर्वांच्या सोबतीने आणि साक्षीने महाराष्ट्राला हेवा वाटेल, असा पर्वती मतदार संघ घडविण्यासाठी मी अहोरात्र कार्यरत राहणार असल्याचे मत महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अभय छाजेड, भरत सुराणा, सुरेश चौधरी, पुष्कर अबनावे, स्नेहल पाडळे, सीमा महाडिक, राष्ट्रवादी पक्षाचे बाळासाहेब अटल, योगेश पवार, लखन वाघमारे,अश्विनी राऊत, दत्तात्रय बंडगर, कुणाल गायकवाड, चंदू माने, भरत काळे, आम आदमीचे राजू ओव्हाळ, नितीन निकम, युसुफ शेख, रोहित शिवशरण उपस्थित होते. प्रभागात सर्वच मंडळांनी कदम यांचे स्वागत भव्य केले.
महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पदयात्रा यशस्वी करण्यात सहभाग घेतला, पर्वती राष्ट्रवादी अध्यक्ष शशिकांत तापकीर, माजी महिला शहर अध्यक्ष मृणालिनी वाणी उपस्थित होते.





