Pune : पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवाला १ ऑगस्ट पासून सुरुवात; सोन्याच्या आणि हिऱ्याच्या घडणावळीवर आकर्षक सवलती

Pune : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पु. ना. गाडगीळ आणि सन्स नेहमीप्रमाणे आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स घेऊन आले आहेत. “मंगळसूत्र महोत्सव” या विशेष उपक्रमांतर्गत सोन्याच्या आणि हिर्यांच्या मंगळसूत्रावर भव्य सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमांतर्गत मंगळसूत्राच्या मजुरीवर तब्बल ५०% पर्यंत सूट तसेच मंगळसूत्र खरेदीसोबत हिर्यांच्या पेंडंटच्या मजुरीवर तब्बल १००% सूट अशी आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. हा मंगळसूत्र महोत्सव दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी सुरु होणार असून, दि. १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत सर्व पु. ना. गाडगीळ आणि सन्स शोरूममध्ये सुरू राहणार आहे.
पिढ्यानपिढ्या विश्वास आणि गुणवत्तेची परंपरा जपणाऱ्या पु. ना. गाडगीळ आणि सन्स साठी मंगळसूत्र ही केवळ दागिन्याची वस्तू नसून भारतीय संस्कृतीतील एक भावनिक आणि पवित्र बंधनाचे प्रतीक आहे. या महोत्सवाद्वारे प्रत्येक ग्राहकाला सुवर्ण आणि हिर्यांच्या दागिन्यांच्या अप्रतिम रचना अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
या निमित्ताने पु. ना. गाडगीळ आणि सन्स चे प्रवर्तक अजित गाडगीळ म्हणाले, “आमच्या ग्राहकांना मन:पूर्वक आमंत्रण देतो की त्यांनी आपल्या जवळच्या पु. ना. गाडगीळ आणि सन्स शोरूमला नक्की भेट द्यावी. या मंगळसूत्र महोत्सवात दिलेल्या विशेष सवलतींचा लाभ घ्या आणि या सणासुदीचा आनंद सोने-हिर्यांच्या मंगळसूत्रांच्या सुंदर संग्रहासह साजरा करावा. आपल्या प्रत्येक क्षणाला उजळवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत.”
या महोत्सवात पारंपरिक डिझाईन्ससोबत आधुनिकतेचा संगम असलेल्या विविध प्रकारच्या मंगळसूत्रांच्या तसेच आकर्षक हिर्यांच्या पेंडंटच्या रचना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, गार्गी आणि रेवा या ब्रँड्सअंतर्गत हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या अप्रतिम आणि आधुनिक डिझाईन्स विशेष ऑफरसह उपलब्ध आहेत.
या महोत्सवात पारंपरिक डिझाईन्ससोबत आधुनिकतेचा संगम असलेल्या विविध प्रकारच्या मंगळसूत्रांच्या तसेच आकर्षक हिर्यांच्या पेंडंटच्या रचना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वधू-वरांपासून ते दैनंदिन वापरासाठी सोयीस्कर असलेल्या डिझाईन्सपर्यंत सर्व काही येथे एकाच छताखाली मिळणार आहे.
सोनं, चांदी आणि हिर्यांच्या दागिन्यांच्या खरेदीत पु. ना. गाडगीळ आणि सन्स नेहमीच ग्राहकांचा विश्वास संपादन करत आले आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांना केवळ ऑफरच नव्हे तर दर्जेदार सेवा आणि उत्कृष्टतेचा अनुभव देण्याचा उद्देश आहे.
१७ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणाऱ्या या मंगळसूत्र महोत्सवात सहभागी होऊन आकर्षक ऑफरचा लाभ घ्या आणि आपल्या आनंदाच्या क्षणांना सोन्याचा नवा तेजोमय स्पर्श द्या. पु. ना. गाडगीळ आणि सन्स – परंपरेतून निर्माण होणारा विश्वास, सौंदर्य आणि आनंद.





