Pune: वाहनांवरील थकीत दंड कमी करण्याची संधी; येरवडा येथे मदत केंद्र सुरू

पुणे – येरवडा येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात मदत केंद्र सुरू करण्यात आला असून वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी वाहनांवरील थकीत दंड तडजोडीतून कमी करून घ्यावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहीदास पवार यांनी केले आहे.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून दि. ५ मे रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. लोकअदालतीत तडजोडीने प्रलंबित खटले मार्गी लावण्यात येतात. वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. थकीत दंडाची रक्कम कमी करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक शाखेकडून वाहनचालकांसाठी मदत कक्ष सुरू (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहे. मदत केंद्राचे कामकाज वाहनचालकांसाठी मदत केंद्र दि. ४ मे पर्यंत सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० आणि दुपारी ०३:०० ते सायंकाळी ०५:०० या वेळेत सुरू राहणार आहे.





