Pune: धरणसाखळी परिसरात मान्सूनची सलामी

पुणे – जिल्हा आणि शहरात दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या परिसरात दमदार सलामी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा खडकवासला धरण क्षेत्रात झाला आहे.
पुण्यात मान्सूनचे आगमन झाले असून, आता धरणांच्या परिसरात पाऊस सुरू झाला आहे. मागील वर्षी अपुरा पाऊस त्यामुळे धरणे जेमतेम भरली. मात्र धरणातून विसर्ग करण्यात आला नव्हता. तसेच परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ त्यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे. रविवारी टेमघर धरणात 52, वरसगाव- 41, पानशेत-39 आणि खडकवासला धरणात 59 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
यंदा दीड टीएमसी कमी पाणीसाठा
खडकवासला प्रकल्पात मागील वर्षी याच दिवशी 5.78 टीएमसी म्हणजे 19.84 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर आता 4.21 टीएमसी म्हणजे 14.45 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आता नागरिकांचे लक्ष धरणांतील पाणीसाठ्याकडे लागले आहे.
धरण नाव – पाणीसाठा (टक्के)
टेमघर- 2.17 टक्के
वरसगाव- 12.72 टक्के
पानशेत – 13.63 टक्के
खडकवासलला – 1.05 टक्के





