पुणे : शहरात फक्त 484 खड्डे!

पुणे – गेल्या दीड वर्षांपासून खासगी केबल कंपना, मनपा पथ विभाग आणि ड्रेनेज विभागाकडून बेसुमार रस्ते खोदाई झाली आहे. शिवाय, रस्ते दुरुस्तीदेखील तकलादू झाली आहे. अशा वेळी शहरातील रस्त्यांवर केवळ 484 खड्डे असल्याचा अजब दावा महापालिकेच्या पथ विभागाने केला आहे. तर आजअखेर खोदाईसाठी संपूर्ण शहरात सुमारे 15 किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले असून ते 7 जूनपर्यंत दुरुस्त केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरात पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते दुरुती सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पालिकेकडून आठ झोनअंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार शहरात 18 मे अखेर केवळ 484 खड्डे असल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, काही भागांत तर अर्धा रस्ता सिमेंटचा, तर काही भाग डांबरी रस्त्याचा आहे. अशावेळी
परिस्थिती वेगळीच
प्रत्यक्षात शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची स्थिती भयावह असून ड्रेनेजची असमोतोल झाकणं, बेकायदेशीर ड्रेनेज जोड, खोदाईनंतरच्या निकृष्ट रस्ते दुरुस्तीमुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिकेचा या खड्ड्यांच्या दाव्यांमुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
23 गावांकडे दुर्लक्षच?
समाविष्ट 23 गावांमधील रस्त्यांची चाळण झालेली असताना या अहवालात या गावांच्या रस्त्यांचे सर्वेक्षणच झालेले नसल्याचे चित्र आहे. या गावांसाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र निधी आहे. पण, तेथे संपूर्ण रस्तेच दुरूस्त केले जातील असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याच्या निविदा कधी काढणार, कामे कधी होणार याबाबत कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नाही.






