पुणे : ससेवाडीतील खून प्रकरणात एकाला जन्मठेप
Updated On:

पुणे – दारू पिऊन घराचा दरवाजा वाजविल्याचा राग मनात धरून कटावणीने मारहाण करून खून करणाऱ्यास जन्मठेप आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी सुनावली. विशेष म्हणजे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना हवालदार सचिन अडसूळ आणि उमेश जगताप यांनी पश्चिम बंगाल येथून आणून साक्षीसाठी हजर ठेवले. त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
रोनिन माणिक सरकार (रा. उत्तरकेसपुर ता. कुमारगंज, जि. दखनदिनासपुर, पश्चिम बंगाल) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. युकील मुनदारी (55, रा. सिमोलीया ता. निसचिंतापुर, 24 परगणा, पश्चिम बंगाल) यांचा खून करण्यात आला होता. याबाबत सतीश नामदेव मादळे (48, रा. मोहननगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी काम पाहिले.





