Pune : दहा प्रभागांवर एकही हरकत नाही; हरकती नोंदविण्यासाठी शेवटचे तीन दिवस

पुणे : महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी प्रभाग हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर मोडतोड केल्याचे आरोप केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व प्रभागांवर हरकती घेतल्या जातील, अशी अपेक्षा होती.
प्रत्यक्षात ४१ प्रभागांमधील १० प्रभागांमध्ये एकही हरकत दाखल झालेली नाही तर २४ प्रभागांमध्ये १० पेक्षाही कमी हरकती नोंदविल्या आहेत, सात प्रभागांमध्ये १० पेक्षा अधिक आणि दोन प्रभागांमध्ये १०० पेक्षा अधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
दहापेक्षा कमी हरकती असलेल्या प्रभागांमध्ये प्रभागाचे नाव तसेच हद्दीतील किरकोळ बदलांची तक्रार आहे. पालिकेकडून ही प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. त्यावर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. त्यामुळे आता हरकतींसाठी शेवटचे तीन दिवस उरले असून, आतापर्यंत पालिकेकडे ५९५ हरकती आल्या आहेत.
हरकत नसलेले प्रभाग
प्रभाग ५ – कल्याणी नगर – वडगावशेरी
प्रभाग ७ – गोखलेनगर – वाकडेवाडी
प्रभाग १० – बावधन – भुसारी काॅलनी
प्रभाग १२ – छत्रपती शिवाजीनगर – माॅडेल काॅलनी
प्रभाग २५ – शनिवारपेठ – महात्मा फुले मंडई
प्रभाग २९ – डेक्कन जिमखाना – हॅपी काॅलनी
प्रभाग ३० – कर्वेनगर – हिंगणे होम काॅलनी
प्रभाग ३१ – मयूर काॅलनी – कोथरूड
प्रभाग ३६ – सहकारनगर – पद्मावती
प्रभाग ४० – कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
१० पेक्षा जास्त हरकती
प्रभाग १३ – पुणे स्टेशन – जय जवाननगर
प्रभाग १४ – कोरेगाव पार्क – मुंढवा
प्रभाग १६ – हडपसर – सातववाडी
प्रभाग १८ – वानवडी – साळुंखे विहार
प्रभाग २४ – कमला नेहरू हाॅस्पीटल – रास्तापेठ
१०० पेक्षा अधिक हरकती
प्रभाग १५ – मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी
प्रभाग ३४ – नर्हे – वडगाव बुद्रुक.





