Pune News : वाढते पेट्रोल-डिझेल दर, सातत्याने वाढणारी महागाई आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानावर होत असलेल्या गंभीर परिणामांच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आज पुण्यात (Pune News) अनोखे व प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. गुडलक चौक येथील बी. यू. भंडारी पेट्रोल पंपावर नागरिकांना “Melody” चॉकलेटचे वाटप करून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध (Pune News) व्यक्त करण्यात आला. “Melody इतकी गोड, पण महागाईने जनतेचे जीवन कडू केले” असा संदेश देत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ, गॅस सिलेंडर, खाद्यतेल, दूध, भाजीपाला आणि घरभाड्यांच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कसे कोलमडले आहे, याकडे लक्ष वेधले. Pune News यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (प्रसारमाध्यम विभाग) अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले, “आज देशातील सामान्य नागरिक प्रचंड महागाई आणि इंधन दरवाढीच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. केंद्र सरकारकडून फक्त जाहिराती आणि आश्वासने दिली जात आहेत; मात्र जनतेला कोणताही प्रत्यक्ष दिलासा मिळत नाही. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यपदार्थ आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील आणि सरकारला जनतेच्या भावना समजून घेण्यास भाग पाडेल.” या आंदोलनातून (Pune News) केंद्र सरकारने वाढत्या महागाईकडे गांभीर्याने लक्ष देऊन इंधन दर कमी करावेत तसेच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली. यावेळी मीडिया विभागाचे प्रदेश अध्यक्ष अक्षय जैन, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश बागवे, पुणे प्रभारी गणेश उबाळे, सरचिटणीस भूषण रानभरे, मेघश्याम धर्मावत, दिलीप देशमुख, नेहल देशमुख, भाविका राका, विश्वजीत जाधव, सत्यजीत बिराजदार, विवेक कडू, यश कोलते, विक्रांत धोत्रे, ॲड. सुरज जमादार, तेजस बनसोड, प्रसन्न मोरे आदी उपस्थित होते.