पुणे | ग्राहक संस्थांची आजपासून कार्यशाळा
Updated On:

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार लि. आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सहकारी ग्राहक संस्थांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दि. १० व ११ फेब्रुवारी रोजी जे. पी. नाईक शैक्षणिक व विकास संस्था कोथरूड येथे होणार आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन साखर आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कार्यवाह, आमदार डॉ. विश्वजीत कदम असतील. या वेळी भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समिती अध्यक्षा विजयमाला कदम, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, ग्राहक भांडार अध्यक्षा डॉ. मंदाकिनी पानसरे, तसेच जगन्नाथ शिंदे, प्राचार्य डॉ. बी. एन. पवार आदी उपस्थित राहणार आहेत.





