Pune News : एरंडवणा येथील एका इमारतीत वाहनांना आग; कोणतीही जीवित हानी नाही

पुणे – एरऺडवणा येथील कृष्णा निवास या इमारतीतील पार्किंगमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांना आग लागली होती. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
कृष्णा निवास या ठिकाणी तळमजला अधिक दोन मजले इमारतीत पार्किंग मध्ये दुचाकी व चारचाकी वाहने लावलेली होती. या वाहनांना अचानक आग लागली होती.त्यामुळे इमारतीत मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान अग्निशमन दलाचा विभागाला आगीची खबर मिळताच तात्काळ अग्निशमन दलाची तीन वाहने घटनास्थळी तात्काळ दाखल झाली.अग्निशमन दलातील जवानांनी आग विझविण्या बरोबरच वरील मजल्यावर धूरात अडकलेल्या नागरिकांना इमारतीत प्रवेश वाचविले.
इमारतीच्या बाहेरील बाजूस शिडी लावून सात ते आठ नागरिकांना बाहेर काढले. आग आटोक्यात आल्या नंतर व कोणताही धोका नसल्याची खात्री केल्यानंतर संबधित नागरिकांना पुन्हा इमारतीत सोडण्यात आले.
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. काही प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी सांगितले की टू व्हीलरला आग लागली होती. ती आग पसरली व पार्किंग मध्ये असणाऱ्या इतर गाड्या व मीटर बाॅक्स पेटला, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.





