Pune News : वाघोलीत पुणे नगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार
Updated On:

वाघोली : वाघोलीत पुणे नगर महामार्गावर चुलबूल ढाब्यासमोर एका कारने अचानक पेट घेतला होता. मंगळवारी (दि.१३) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीएमआरडीए वाघोली अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहचून ही आग विझविली. त्यामुळे कारचा केवळ पुढचा भाग जळाला.
या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. वाघोलीत पुणे नगर महामार्गावर चुलबूल ढाब्यासमोर एका कारने अचानक पेट घेतला होता. मंगळवारी (दि.१३) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पीएमआरडीए वाघोली अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहचून ही आग विझविली. त्यामुळे कारचा केवळ पुढचा भाग जळाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.





