pune news : राज्य सरचिटणीसपदी ॲड. मनिष मगर यांची नियुक्ती
Updated On:

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (लिगल सेल) च्या राज्य सरचिटणीस पदी ॲड. मनीष बाळासाहेब मगर यांची निवड झाली आहे. त्यांनी पुणे बार असोसिएशनचे सचिव म्हणून काम केले आहे. ते पुणे लॉयर्स कंझ्युमर्स सोसायटीचे विद्यमान संचालक आहेत.
लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष व बार कौन्सिल ॉफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान सदस्य ॲड. आशिष देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी ॲड. भगवानराव साळुंखे व लिगल सेलचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पक्ष बळकटीसाठी आणि पक्षाची धोरणे वकील व सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नियुक्तीनंतर ॲड. मगर यांनी सांगितले.





