Pune News : ‘शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी’ महाविद्यालयात संस्था वर्धापन दिन उत्साहात साजरा

Pune News : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे या संस्थेच्या खराडी येथील शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी संस्था वर्धापन दिन आणि संस्थेचे भूतपूर्व मानद सचिव शंकरराव उरसळ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तसेच संस्था वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी सायन्स एग्ज़िबिशन म्हणजेच विज्ञान प्रदर्शनाचे ही आयोजन करण्यात आले होते. सदरच्या संस्था वर्धापन दिन आणि सायन्स एग्ज़िबिशनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य प्रदीप कदम उपस्थित होते.
संस्था वर्धापन दिन कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयातील डी. फार्मसी च्या प्रगती आव्हाले, रूपाली पांढरे, बी. फार्मसी च्या तनिष्का पवार आणि एम.फार्मसी च्या श्रुति इप्पलवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संस्था, महाविद्यालय याबद्दल ऋण व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना दिनांक 7 सप्टेंबर 1941 रोजी झालेली असल्याचे सांगून संस्थेस सन 2000 चा महाराष्ट्र शासनाचा “बेस्ट एज्युकेशन अवॉर्ड ” प्राप्त झाल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले यांनी संस्थेचे भूतपूर्व मानद सचिव शंकरराव उरसळ यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रदीप कदम यांनी आपल्या मनोगतामध्ये बाबुराव घोलप यांनी दिनांक 7 सप्टेंबर 1941 रोजी लावलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्ष झाल्याचे सांगितले. आज संस्थेच्या प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक हायस्कूल्स आणि प्रोफेशनल कॉलेजेस अशा विविध शाखा असून त्यामध्ये एकूण जवळपास एक लाख विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. विजया बर्गे ,पदवीका विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुजित काकडे व इतर महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका तृप्ती शहा यांनी केले तर आभार प्रदर्शन पदविका विभागाच्या प्राध्यापिका रुचिता भालेराव यांनी केले.
संस्था वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सायन्स एग्ज़िबिशन म्हणजेच विज्ञान प्रदर्शनामध्ये डी फार्मसी विभागातून 4, बी फार्मसी विभागातून 24 आणि एम फार्मसी विभागातून 3 असे एकूण 31 प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी “सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सोसायटी ” या शीर्षकाखाली हेल्थकेअर, हेल्थकेअर मध्ये फार्मासिस्टची भूमिका, कृषी तंत्रज्ञान इत्यादी वरील प्रोजेक्ट्स सादर केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले आणि प्रमुख पाहुणे प्रदीप कदम यांनी प्रोजेक्ट्स सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. सदरच्या संस्था वर्धापन दिन कार्यक्रम आणि सायन्स एग्ज़िबिशन चे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सायन्स एग्ज़िबिशन साठी पदवी विभागातून प्राध्यापक विक्रम वीर आणि पदविका विभागातून पल्लवी खरबस यांनी विशेष प्रयत्न केले.





