Pune News : पुण्यातील बाह्यवळण मार्ग धोकादायक; ५ महिन्यात सहाजणांचा मृत्यू
Updated On:

पुणे – गेल्या पाच महिन्यात बाह्यवळण मार्गावर पाच गंभीर अपघात झाले असून, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. बाह्यवळण मार्गावरील अपघाताच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, महामार्ग प्राधिकरणाने विविध उपाययोजना केल्या आहेत.
बाह्यवळण मार्गावरील दरीपूल ते नवले पूल दरम्यान तीव्र उचारावर भरधाव वाहनांचे नियंत्रण सुटून गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. अपघाताच्या घटना रोखण्यासाठी गतीरोधक, वेग नियंत्रणासाठी ‘रमब्लिंग स्ट्रीप’, वेगमर्यादा, तसेच जागोजागी फलक लावण्यात आले आहे.
अवजड वाहनचालकांकडून वेगमर्यादा धुडकावून येत असल्याने गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.





