Pune News | पुणे विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण प्रवेशाला मुदतवाढ ; जाणून घ्या अंतिम तारीख

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दुरुस्ठ अध्ययन प्रशालेद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना १० ऑक्टोबरपर्यंत प्रवेशाची संधी असणार आहे. या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यापीठाच्या मुक्त व दुरुस्थ पद्धतीने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नव्या नियमानुसार आता विद्यार्थ्यांना नियमित पदवीसोबत मुक्त व दुरस्थ पद्धतीने पदवी घेणे किंवा मुक्त व दुरस्थ पद्धतीने विद्यापीठाच्या दोन पदव्यांमध्ये एकाच वेळी प्रवेश घेणे शक्य झाले आहे.
त्यामुळे या संधीचा लाभ मोठ्या संख्येने विद्यार्थी घेतील, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.यूजीसीच्या नवीन नियमांमुळे नियमित पदवी सोबत मुक्त व दुरस्थ पद्धतीने विद्यापीठातील पदवी घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच, पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. नोकरी करणारे, व्यवसायिक, गृहिणी किंवा नियमित महाविद्यालयात जाऊ न शकणारे विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन शिक्षण पूर्ण करू शकतात. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी या https://unipune.ac.in/SOL/ संकेतस्थळावर किंवा जवळच्या अभ्यास केंद्रात माहिती मिळू शकणार आहे.





