Pune News: ज्येष्ठ व्यंगचित्रकार ‘शि.द.फडणीस’ यांचे टपाल तिकीट
Updated On:

पुणे : महानव्यक्ती कींवा महत्वपूर्ण योगदान असणार्या व्यक्तींचे फोटो टपाल तिकीटावर छापण्यासाठी भारत सरकारची जुनी योजना आहे. याच योजनेअंतर्गत सुप्रसिध्द ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांनी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने भारत सरकारच्या या टपाल तिकीट योजनेनुसार पुण्याचे वारली चित्रकार समीर धर्माधिकारी यांनी व्यंगचित्रकार शि.द .फडणीस यांचे टपाल तिकीट तयार करून एक आगळी वेगळी भेट सादर केली.
सदर टपाल तिकीट हे पुण्याचे सिटी पोस्ट या मुख्य पोस्ट आॅफीसच्या सहकार्याने, “माय स्टॅम्प” यावर आधारीत आहे. विशेष म्हणजे ईतर टपाल तिकीटांप्रमाणेच देशात कोठेही हे टपाल तिकीट वापरून पत्र पाठविता येते. या वेळी पुणे सिटी पोस्ट मुख्य कार्यालयाचे वरिष्ठ पोस्ट मास्टर संदिप ढवळे आणि त्यांचे सहकारी अभिमन्यू क्षिरसागर हे उपस्थित होते.




