Pune news : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी..! आज शहरातील अनेक भागात होणार बत्ती गुल
वीज बंद काळात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पर्वती विभाग, पुणे यांनी केले आहे.

पुणे – महावितरण कंपनीकडून देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने पर्वती विभागांतर्गत येणाऱ्या अनेक भागांचा वीजपुरवठा गुरुवार, दि. 05 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
चार फिडरवरील वीजपुरवठा खंडित :
या काळात 22/11 kv नवीपेठ, 22/11 kv, तक्षशिला, 11 kv, तरुण भारत आणि 11 kv विठ्ठलवाडी या फिडरवरील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
अनेक भागांना वीज बंदीचा फटका :
पत्रकार भवन, फाटकबाग सोसायटी, सेनादत्त पोलिस चौकी, श्री सईनगर, लोकमान्यनगर, राजेंद्रनगर, गांजवे चौक, न्यू इंग्लिश स्कूल, रामबाग कॉलनी, सदाशिवपेठ, कुमठेकर रोड, पेरूगेट, वाडिया हॉस्पिटल, शुक्रवारपेठ, बुधवारपेठ, फरासखाना, जोगेश्वरी, लक्ष्मी रोड, श्रीनाथ थिएटर, बाजीराव रोड,
टिळक रोड, टेलिफोन एक्सचेंज, चिमण्या बाग, एस.पी. कॉलेज, फुले मंडई, हत्ती गणपती, भरतनाट्यम मंदिर, भारती विद्यापीठ भवन, वैकुंठ स्मशानभूमी, नवीपेठ, पुना हॉस्पिटल, जेएसपीएम कॉलेज, अभिनव कॉलेज, स्वामीनारायण मंदिर, पारि कंपनी चौक, अष्टविनायक इंडस्ट्रियल एरिया, धायरी व लगतचा परिसर यांचा समावेश आहे.
ग्राहकांना सहकार्याचे आवाहन :
वीज बंद काळात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पर्वती विभाग, पुणे यांनी केले आहे.
हेही वाचा:





