Pune News : ‘नीट असेल दृष्टी तरच पाहू सृष्टी’ – शोभा धारीवाल

Pune News : आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्मार्टफोन, कॉम्प्युटरचा अतिवापर, टीव्ही अधिक काळ पाहत राहणे, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, तणाव, जागरण यांमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडत चाललेले आहे. अनेकांना दूरचे दिसत नाही तर काहींना जवळचे दिसत नाही तर काहींना धूसरच दिसू लागते.
अनेक लोक डोळ्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांची काळजी घेत नाही तर काहींना डोळे सुद्धा आजारी पडतात याची जाणीव नसते, योग्य वेळी व वेळोवेळी डोळे तपासून घेणे तसेच डॉक्टरांनी निदानानंतर दिलेला चष्मा नेहमी डोळ्यावर ठेवणे आवश्यक आहे.
ध्यानात ठेवा कि “नीट असेल दृष्टी तरच पाहू सृष्टी” असे आवाहन आर एम डी फाऊंडेशन द्वारा ढोले पाटील वसाहत, गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क व बर्निंग घाट बंड गार्डन येथे आयोजित मोफत डोळे तपासणी व चष्म्याचे वितरण शिबिराच्या समारोप प्रसंगी केले.
या तिन्ही ठिकाणी मिळून १५०० पेक्षा अधिक स्त्री-पुरुष , वृद्ध तसेच लहान मुलांचे डोळे तपासण्यात आले तर १२५० लोकांनी मोफत चष्म्याचा लाभ घेतला. याप्रसंगी अध्यक्ष व कार्यकर्ते बंडगार्डन गणेश मित्र मंडळ, भीम शक्ति तरुण मंडळ, पंचशील फाऊंडेशन ताडीवाला इत्यादी व वसाहतीतील जनता मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.





