Pune news : हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३०० हमाल बांधवांची आरोग्य तपासणी; १८ जणांचे रक्तदान
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी केल्यास अनेक गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार शक्य होतात

Pune news : जयराज ग्रुपचे संस्थापक हिराभाई शहा यांच्या १०व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या डोळे तपासणी, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, बीएमडी (Bone Mineral Density) तपासणी तसेच रक्तदान शिबिराला हमाल बांधव व त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश शहा यांनी, “सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी केल्यास अनेक गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार शक्य होतात,” असे सांगितले.
यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरख मेंगडे, पुना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष दीपक बोरा, अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, पुणे हॉस्पिटलचे ट्रस्टी अशोक ओसवाल, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष मिलिंद पाटील, जयराज ग्रुपचे संचालक धवल शहा, पूना गुजराती बंधू समाजाचे खजिनदार हरीश शहा तसेच अमनोरा एस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी उपस्थित होते.
या शिबिरात बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून रुग्णालय, एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, सिप्ला ब्रीद फ्री, पुणे हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज आणि अमनोरा एस फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.
शिबिरामध्ये ३०० हमाल बांधवांची नेत्रतपासणी करण्यात आली, २०० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, २५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली, ३० महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली, तर १८ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाला व्यापारी आणि हमाल बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.





