Pune News : गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात
येरवडा येथील गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Pune News : येरवडा येथील गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सभासद तसेच मुद्रणालयातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापक संतोष ढवळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अधिकारी हेमंत साबळे, उद्धव नेहरकर, अनिल राऊत आणि नितेश लोंढे तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक सावळा हाके यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे चेअरमन विष्णू धावणे यांनी केले. यावेळी व्यवस्थापक संतोष ढवळे यांनी संस्थेच्या ७१ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल सभासदांचे अभिनंदन करून भविष्यातही संस्थेची प्रगती अशीच सुरू राहावी, अशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे संचालक प्रदीप भालेराव, सागर माने, मल्हारी बोधे, प्रभाकर घुगे, ओंकार नाडेकर, सूर्यकांत बनसोडे, कुमार जाधव, प्रसाद उरुणकर, विठ्ठल अर्जुन आणि शरद सुरकुले, तसेच संस्थेचे सेक्रेटरी आनंद केंगले आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सन १९५५ मध्ये स्थापन झालेल्या या सहकारी पतसंस्थेने गेली ७१ वर्षे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्य केले असून, संस्थेच्या पुढील वाटचालीस उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.





