pune news : ‘गिनीज रेकॉर्डने ‘खडकी संस्थेस’च्या शिरपेचात मानाचा तुरा…

पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यास व पुणे पुस्तक महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबरमध्ये पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे च्या वतीने व संस्था अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या अथक परिश्रमाने, विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भारत हा शब्द साडेसात हजार पुस्तकांच्या मदतीने तयार करण्यात आला होता.
आणि चीनचा असलेला विश्वविक्रम मोडण्यात आला होता यावेळी नवीन विश्वविक्रम रचण्यात यश आले. यावेळी गिनिज चे अधिकारी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात खडकी शिक्षण संस्थेस आणि कृष्णकुमार गोयल यांना गिनीजचे सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे अध्यक्ष राजेश पांडे ,खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड प्राचार्य संजय चाकणे, गजानन आहेर उपस्थित होते.
यावेळी श्रीकृष्ण कुमार गोयल यांनी खडकी शिक्षण संस्था ही परिसरातील नानावलेली संस्था असून शैक्षणिक विकासासाठी अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. त्यातच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्यामुळे शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी संस्थेचे ,विद्यार्थ्यांचे ,पालकांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आणि अशीच संस्थेची प्रगती होत राहो यासाठी शुभेच्छा दिल्या. राजेश पांडे यांनी हा योग जुळवून आणला आणि येणाऱ्या पुस्तक महोत्सवास सुद्धा संस्थेने भरीव मदत करावी असे प्रतिपादन केले. डॉक्टर संजय चाकणे यांनी सर्वांचे आभार मानले.





