Pune News : दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचे भव्य आयोजन
शिक्षण क्षेत्रात शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या दि पूना गुजराती केळवणी मंडळाचा (Pune News) शताब्दी महोत्सव रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.

Pune News : शिक्षण क्षेत्रात शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या दि पूना गुजराती केळवणी मंडळाचा (Pune News) शताब्दी महोत्सव रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
२६ जुलै १९२६ ते २६ जुलै २०२६ या शंभर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात दि पूना गुजराती केळवणी मंडळाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान (Pune News) देत ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समृद्ध परंपरा निर्माण केली आहे. या गौरवशाली शैक्षणिक प्रवासाचा गौरव करण्यासाठी शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या ऐतिहासिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमास दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश शाह, उपाध्यक्ष जनक शाह, सचिव हेमंत माणियार तसेच मंडळाचे सर्व विश्वस्त, कौन्सिल सदस्य, मान्यवर, शिक्षणप्रेमी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व हितचिंतक उपस्थित (Pune News) राहणार आहेत.
“शिक्षणातील उत्कृष्टतेची १०० वर्षे” या गौरवपूर्ण संकल्पनेतून साजरा होणाऱ आहे. सदर कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थ्यांंना आग्रहाचे निमंत्रण आहे.
अधिक माहितीसाठी संदीप देशपांडे यांना 9422031024 या क्रमांकावर संपर्क करा.
कार्यक्रमाचे ठिकाण : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे – ४११०४२
दिनांक : रविवार, २६ जुलै २०२६
वेळ : सायं. ४.३० वाजता
– दि पूना गुजराती केळवणी मंडळ, पुणे






