Manjusha Nagpure: सातत्याने योगाभ्यास हाच निरोगी जीवनाचा मार्ग – महापौर मंजुषा नागपुरे
Manjusha Nagpure: राज्यभरातून ५०० हून अधिक योगपटूंचा स्पर्धेत सहभाग

पुणे : वाढता ताण, धकाधकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्येही विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. अगदी २१ वर्षांच्या तरुणांनाही डायलिसिसची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत सातत्याने योगाभ्यास केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखता येते, असा संदेश महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिला.
मनो-वर्धन योग संस्था आणि महाशक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने सहकारनगर येथील ढुमे क्रीडा संकुलात आयोजित २८व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या.
यावेळी योगतज्ज्ञ मनोज पटवर्धन यांनी स्पर्धेच्या २८ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. मुसळधार पावसातही राज्यभरातून ५०० हून अधिक योगपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. पाच ते ८७ वर्षे वयोगटातील स्पर्धकांनी योगासने सादर केली. विविध योगसंस्था, डी.ई.एस. शाळा, महर्षी कर्वे शाळा तसेच रुईया मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग हे स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाला नगरसेवक वीणा घोष, सई थोपटे, महेश वाबळे, गणेश घोष आणि भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंद पटवर्धन यांनी केले. ऋचा लिमये यांनी पसायदान सादर केले, तर महेश खांडेकर यांनी आभार मानले.
हेही वाचा:





