Pune News : धनगरवाडीत अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी; 4.48 लाखांचा तंबाखूजन्य माल जप्त
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जुन्नर तालुक्यातील (Pune News) धनगरवाडी येथे छापेमारी करून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण ४ लाख ४८ हजार ५०६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Pune News : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जुन्नर तालुक्यातील (Pune News) धनगरवाडी येथे छापेमारी करून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण ४ लाख ४८ हजार ५०६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी संतोष शामराव सावंत (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धनगरवाडी (Pune News) परिसरात मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत मारुती सीताराम शेळके (वय ६६, रा. धनगरवाडी, ता. जुन्नर) यांच्या गोडाऊनची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान केशरयुक्त विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू, रत्ना सुगंधित तंबाखू, हिरा पान मसाला, रॉयल सुगंधित तंबाखू, महक चैनी फिल्टर पाऊच तंबाखू, मिराज चुनामिश्रित तंबाखू तसेच आंटी गोड सुपारी आदी प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळून आला. या सर्व मालाची किंमत ४ लाख ४८ हजार ५०६ रुपये इतकी असून तो जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईमुळे (Pune News) परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अधिक तपास अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






