Pune News : पुण्यातील मगरपट्टा सिटीच्या मागील बाजूस खडकवासला धरणातून दौंडकडे जाणारा नवीन मुठा कालवा फुटल्याची घटना घडली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वेगाने नागरी वस्तीत शिरले असून, मगरपट्टा आणि हडपसर परिसरात अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या येथील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की, रस्त्यावरील अनेक वाहने वाहून गेली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला असून एकाच मार्गावर वाहतूक सुरू असल्याने सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खडकवासला पाटबंधारे विभागाने तातडीने कालव्याचा प्रवाह बंद केला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून कालव्यातून किरकोळ गळती सुरू होती. मात्र परिसरात सुरू असलेल्या पाइपलाइन कामामुळे कालव्याची भिंत कमकुवत झाली आणि अखेर कालवा फुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Pune News हेही वाचा: Kangana Ranaut: डिप्रेशन दिलेल्या भूमिकेनेच वाचवलं करिअर; ‘फॅशन’मधील सोनाली ठरली कंगनासाठी टर्निंग पॉईंट!