हडपसर : सरकार महाराणी लक्ष्मी बाई गर्ल्स पी.जी कॉलेज इंदोर आणि एकाग्रह आर्ट कल्चर व हेरिटेज फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय कला स्पर्धेत मगरपट्टा सिटीतील कलाकार मोनिका गुजर या दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या असून त्यांनी सिल्व्हर मेडल पटकावले आहे.
या राष्ट्रीय ऑनलाइन स्पर्धेत संपूर्ण भारतातून चार हजार कलाकारांनी भाग घेतला होता. त्यामध्ये मोनिका गुजर यांना सिल्वर पदक मिळाले आहे . चंदिगढ विद्यापीठाच्या ललित कला विभागाकडून या कला प्रदर्शन आणि स्पर्धेत दोन हजार पेक्षा अधिक कलाकारांनी भारतामधून भाग घेतला होता. अशा या आंतरराष्ट्रीय स्तरावर मोनिका गुजर यांची रौप्य पदकासाठी निवड झाली आहे.
याविषयी मोनिका गुजर म्हणाल्या की माझ्या महाविद्यालयानंतर मी चित्रांशी पूर्णपणे डिस्कनेक्ट झाले होते. तीन वर्षांपूर्वी मला समजले की माझा माझ्या चित्रांशी दृढ संबंध आहे आणि मी ते जाऊ देणार नाही.
मग मी माझी नोकरी सोडली आणि चित्रे पुन्हा सुरू केली. माझा असा विश्वास आहे की सार्वत्रिक ऊर्जा मला नवीन कलाकृती तयार करण्यास नेहमीच मदत करते आणि मी माझ्या कला कार्याशी खोलवर जोडलेले आहे. या बक्षिसामुळे अधिकची उर्जा मिळाली आहे.