Pune News : प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला; पठारेवस्ती चंदनगर परिसरातील घटना
प्रेमप्रकरणातून प्रेयसीचा ब्लेडने गळा चिरून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Pune News) करण्यात आला. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय.22,रा.चंदनगर, मुळ. उत्तरप्रदेश) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.

Pune News : प्रेमप्रकरणातून प्रेयसीचा ब्लेडने गळा चिरून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Pune News) करण्यात आला. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय.22,रा.चंदनगर, मुळ. उत्तरप्रदेश) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी, पोलिसांनी दिलीप राठोड (वय.22) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला (Pune News) आहे. ही घटना बुधवारी (दि.29) रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास पठारेवस्ती चंदनगर परिसरात घडली. याबाबत तरुणीचा भाऊ भगतसिंग जसवंतसिंग दोहरे (वय.25) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपील राठोड आणि जखमी तरुणी उजालादेवी हे एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. तेथे दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र गेल्या काही दिवसापासून त्यांच्यात वाद होते. त्याच कारणातून बुधवारी रात्री दिलीप हा तरुणी राहत असलेल्या पठारेवस्ती चंदननगर येथे आला.
त्याने घरात घुसून तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले.तरुणीवर हल्ला केला तेव्ही ती एकटीच घरी होती. तिचा भाऊ आणि भावाची बायको बाहेर कामावर गेले होते. त्यानंतर तो पसार झाला.
तरुणीने फोन करून आपल्या भावाला ही माहिती दिली. तु लवकर घरी ये मला एका मुलाने मारले आहे. खूप लागले आहे.माझ्या गळ्यातून आवाज येत नाही. त्यानंतर तरुणीने (Pune News) आपल्या भावालाच व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी तरुणी भावाला रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. भावाने घराकडे धाव घेतली. तोपर्यंत तेथील काही नागरिक आणि तरुणीचे नातेवाईक जमा झाले होते. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तरुणीला तिला कोणी मारले असे विचारले तेव्हा तिला बोलता येत नव्हते. तिने इशारा करून पेन आणि कागद मागितला. त्यावर तिने दिलीप राठोड असे लिहले. घरात घुसून तरुणीवर ब्लेडने वार करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप आरोपी दिपील राठोड फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.






