Pune News: कौतुकास्पद कामगिरी! प्रिशा खुट्टेचे राज्य व राष्ट्रीय ‘स्पेल बी’ स्पर्धेत उल्लेखनीय यश
Pune News : भविष्यात शिक्षक किंवा डॉक्टर बनून समाजसेवा करण्याची प्रिशाची इच्छा

Pune News: भवानी पेठ पोलीस लाईनमधील प्रिशा वृषाली सुमित खुट्टे हिने “WIZ International Spell Bee Competition 2025–26” मध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवून शाळेसह कुटुंब आणि पुणे शहराची मान उंचावली आहे.
भवानी पेठ पोलीस लाईन, बिल्डिंग क्रमांक २, रूम क्रमांक २६ येथे राहणारी प्रिशा ही सरदार दस्तुर प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिक्षण घेत आहे. स्पर्धेत तिने राज्यस्तरावर १६ वा क्रमांक, तर राष्ट्रीय मेगा अंतिम फेरीत २३ वा क्रमांक पटकावला. तिला राज्यस्तरीय पुरस्कार व प्रमाणपत्र २० मार्च २०२६ रोजी, तर राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार व प्रमाणपत्र ३० मे २०२६ रोजी प्रदान करण्यात आले.
प्रिशाची आई वृषाली सुमित खुट्टे या सनफायर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, कोथरूड येथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. वडील सुमित खुट्टे हे पुणे शहर पोलीस दलातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत आहेत.
दोघेही नोकरीत व्यस्त असतानाही त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी सातत्याने वेळ दिला. योग्य नियोजन, नियमित मार्गदर्शन आणि प्रिशाच्या क्षमतेवर असलेला विश्वास यामुळे तिच्या यशाचा भक्कम पाया रचला गेला. घरात इतर कोणाचीही नियमित मदत नसतानाही मुलीच्या गुणवत्तेला योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
प्रिशाच्या यशामागे तिची मेहनत, जिद्द आणि चिकाटी याबरोबरच आई-वडील, आजी, बाबा, मामा, मामी तसेच तिच्या वर्गशिक्षिका आलिशा मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
भविष्यात शिक्षक किंवा डॉक्टर बनून समाजसेवा करण्याची प्रिशाची इच्छा आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
हेही वाचा:
Preity Zinta : प्रकरण गंभीर; बॅालिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने घेतली न्यायालयात धाव, नेमकं काय घडलं?





