pune news : सनसिटी रस्त्यावर नागरिकांनी अनुभवली दिवाळी

पुणे – अयोध्येत श्री रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष सिंहगड रस्ता परिसरातही साजरा करण्यात आला, या निमित्त सनसिटी रस्त्यावरील शिवपुष्प चौकात माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे आणि रामसेवक दीपक नागपुरे यांच्या वतीने रामोत्सवानिमित्त नागरिकांसह दिवाळी साजरी करण्यात आली.
नागपुरे यांच्या वतीने कार्यालय परिसरात सुमारे पाच हजार लाडूंचे वाटप करण्यात आहे. या निमित्त शिवपुष्प चौकात आकर्षक फुलांच्या सजावटील प्रभू श्री रामांची मूर्ती बसविण्यात आली होती.
सायंकाळी ६ वाजता ढोलवादनाने कार्यक्रमाची सुरूवात झानंतर मंदार गोखले यांच्या वतीने राम कीर्तन आणि सोबतच दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कारसेवकांचा विशेष सन्मान करत फटाक्यांची आतषबाजी करत उपस्थितांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली.
यावेळी रामनामाचा उल्लेख असलेल्या साडी परिधान करून महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाचे संयोजन रामदूत समीर जागडे, मंगेश बुजवे, दीपक महाडिक, प्रणव कुकडे, सागर साळुंके, विनय मानकर, उमेश ठाकर, अमित गुंड , समीर महाडिक,
निरंजन कोळी, सचिन कदम, सौरभ मंडावले, महेश काटे, विशाल अवघडे, सचिन गोसावी, विक्रांत ढवळे, सुनील भगरे, सुदाम अनारसे, अक्षय गुजराथी, संदीप कदम, अनुज चांडोले, सौरभ सातपुते, महेश जावळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले





