pune news : पुणे लोकमान्य फेस्टिवलच्यावतीने अनिष्ठ प्रवृत्तीच्या भस्मासुराचे दहन
Updated On:

Pune Lokmanya festival – लोकमान्य फेस्टिवलच्यावतीने (Pune Lokmanya festival) लोकमान्य नगर पुणे या ठिकाणी दसऱ्याचे औचित्य साधून वाईट प्रवृत्ती , वाढता दुष्काळ, अन्याय, स्त्रीभ्रूण हत्या, वाढता कचरा, वाहतूक कोंडी, वाढता भ्रष्टाचार, वाढता दहशतवाद अशाचे प्रतीक असलेल्या अनिष्ठ प्रवृत्तीच्या भस्मासुराचे दहन करण्यात आले.
या प्रसंगी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अज्ञान व अंधकारावर विजय मिळवून यशस्वी जीवनाच्या दिशेने प्रत्येकाच्या आयुष्यात सिमोल्लंघन व्हावे हाच संदेश या प्रसंगी पुणे लोकमान्य फेस्टीवलचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी दिला.




