Pune News : धावत्या शिवाई ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव बचावला
Pune News : सेव्हन लव्ह्ज चौकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) धावत्या वातानुकूलित 'शिवाई' इलेक्ट्रिक बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

Pune News : शहरातील मध्यवर्ती स्वारगेट परिसरात असलेल्या सेव्हन लव्ह्ज चौकात धावत्या इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित शिवाई बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने, बसमधील सर्व १७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. (Pune News)
ही घटना सोमवारी सकाळी घडल्याने प्रवाशांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. गोंधळ आरडा ओरड सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. (Pune News)
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शिवााई इ-बस सोमवारी सकाळी स्वारगेटच्या दिशेने जात होती. त्यावेळी बसमध्ये १७ प्रवाशी होते. (Pune News)
बस धावत असताना अचानक चालकाला गाडीतून धूर व ज्वाला दिसू लागल्या. चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली. त्याचवेळी गाडीतील प्रवाशांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. (Pune News)
दरम्यान,अग्निशामक दल, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. प्रवाशांना तात्काळ बाहेर काढल्याने १७ जणांचा जीव थोडक्यात बचावला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. (Pune News)





