Pune News : बुधवार पेठेत फोन पे पासवर्ड विसरल्याने तरुणाला तीन महिलांकडून मारहाण
Updated On:

पुणे : बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी गेलेल्या एका ३९ वर्षीय तरुणाला फोन पे ॲपचा पासवर्ड विसरल्याने तीन महिलांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली.
सिंहगड रोडवरील रहिवासी आणि मूळ जालना जिल्ह्यातील हा तरुण शुक्रवारी रात्री बुधवार पेठेतील एका इमारतीत गेला होता. ऑनलाइन पेमेंट करताना पासवर्ड विसरल्याने व्यवहार अयशस्वी झाला.
यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्याला शिवीगाळ करत दोन अन्य महिलांना बोलावले आणि तिघींनी मिळून त्याला मारहाण केली. पीडिताच्या तक्रारीवरून फरासखाना पोलिसांनी दोन ३२ वर्षीय आणि एक ३४ वर्षीय महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.





